Saturday 12 May 2012

शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट




शिवाजी महाराज  आणि संत  तुकाराम  यांची भेट 

चित्रपटाचे नाव : तुकाराम 




हा खरं  तर  वादातील  मुद्दा आहे , मला कळत नाही  कोण  आहेत  हि  माणसे , ज्यांना या दोन  महान  

व्यक्तीच्या कार्यापेक्षा ह्या  गोष्टीत  रस कसा असू शक तो. पुरावा जरी सापडला तरी  मान्य मात्र कुणीही 

करत  नाही.

राहिला  प्रश्न खरीच भेट झाली होती कि नाही . आपली इतिहासातील  परंपरा जशी आहे त्याप्रमाणे 

इतिहासकाराचे म्हणणे  होते कि हि भेट कधी झालीच  नव्हती . संत तुकारामांचा जन्म 1608 चा आणि 

मृत्यू  1650. शिवाजी महाराजांचा जन्म 1627/30 आणि मृत्यू 1680. या माहितीवरून  आपणास  अंदाज  

बांधता येईल  कि हि भेट 1630 ते 1650 च्या आसपास  झाली असणार . तुकाराम  महाराजांचे वास्तव्य देहू  

गावचे . पुण्याहून जेमतेम 30 km  अंतर . शिवाजी महाराज  धार्मिक  होते याची पूर्ण  महाराष्ट्राला जान 

आहेच . आपण आई तुळजाभवानी भवानी किंवा शिखर शिंगणापूर  या वरून समजू शकता . 1640 च्या 

आसपास  तुकाराम महाराज  यांची ख्याती आसपास च्या गावामध्ये मावळमध्ये होतीच . त्यामध्ये  देहू 

गाव शिवाजी महाराजांकडेच . हि गोष्ट दुर्लक्ष्य कशी होईल . हि भेट 1640-45 च्या दरम्यान झाली असेल 

तर त्या वेळी शिवाजी महाराजांचे वय  20 च्या आसपास  असेल आणि तुकाराम  महाराजांनीच  शिवाजी 

महाराजांना मार्गदर्शन  पण  केले  असेल. तर मला वाटत  नाही कि आता इथून पुढे या भेटी बद्दल प्रश्न 

उपस्थित  करण्याची गरज  आहे .

--------------------------------------------------------------------------------------