Tuesday, 8 May 2012

santa aani banta marathi sms


संताराव आणि बंताराव संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला. संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली -
आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी - सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी - सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली. -------------------------------------------------------------------------


एकदा संता डॉक्टरकडे जातो.संता - '' डॉक्टर माझ्या अंगाला कुठेही बोट लावलं तर खुप दुखतं''
डॉक्टर - '' म्हणजे''
'' हे बघा ... मी माझ्या टोंगळ्याला बोट लावलं... ओ... बापरे किती दुखतं'' संता टोंगळ्याला बोट लावत म्हणाला वेदनेने विव्हळत म्हणाला.
'' आलं आहे माझ्या लक्षात... तुझा प्राब्लेम आला आहे माझ्या लक्षात... '' डॉक्टर म्हणाले.
'' डॉक्टर काय झालं आहे मला ?'' संताने विचारले.
'' काही नाही तुझ्या बोटाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे'' डॉक्टर म्हणाले. 

-------------------------------------------------------------------------

संता बंताला घेवून एटीएम वर पैसे काढायला गेला. संताने कार्ड मशीमधे टाकले, पिन नंबर एंटर केला, आणि पैसे काढले. हे सगळं करतांना बंता संताच्या मागेच उभा होता. एटीएम मधून बाहेर आल्यानंतर 

बंता म्हणाला, '' मला तुझं पिन नंबर माहित झाला आहे... ही .. ही.. ही''


'' हो कां ... मग सांग बरं माझा पिन नंबर काय आहे?'' संताने विचारले. 


बंता म्हणाला, '' चार  स्टार !'' 

-------------------------------------------------------------------------

एकदा संता आणि बंता दारु पिऊन टून्न होवून रस्त्यावर फिरत होते. तेवढ्यात संताला रस्त्याच्या कडेला एक आरसा सापडला. संताने आरश्यात पाहत म्हटले, '' साला हा कुणाचा फोटो आहे? ... याला कुठेतरी पाहालेलं वाटते'''' बघू दे'' बंताने संताजवळून आरसा घेत म्हटले.
'' गधड्या एवढंही समजत नाही ... हा माझा फोटो आहे'' बंता म्हणाला. 

-------------------------------------------------------------------------

संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, '' 'अशक्य' हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही ''बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, '' अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं... आता बोंब मारुन काय उपयोग'' 

-------------------------------------------------------------------------